By  
on  

'‘पानिपत’चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या सुरेक्षेसाठी 200 पोलिसांचा फौजपाटा तैनात , हे आहे कारण

'पानिपत'चा भव्य-दिव्य मराठा इतिहास सिनेरसिकांसमोर दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर लवकरच घेऊन येत आहेत. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रसिकांसमोर आला. पण या सिनेमामुळे चक्क आशुतोष गोवारीकर यांच्या जीवाला धोका आहे. याचं कारण म्हणजे, ऐतिहासिक सिनेमे आणि वाद-विवाद हे काही आता नवीन राहिलेलं नाही. सिनेमातील दृश्यांमुळे, संदर्भांमुळे नेहमीच ऐतिहासिक सिनेमे देणा-या दिग्दर्शकाला वाद-विवादाला सामोरं जावं लागतं. विविध संघटनांकडून  त्यांना  धमक्या मिळत असून गोवारीकरांच्या सुरक्षेसाठी तबब्ल  २०० पोलिसांची फौज तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

ऐतिहासिक घटनांची छेडछाड करुन दृश्य दाखवल्याचा आरोप या संघटनांनी गोवारीकर यांच्यावर करण्यात आला आहे. त्याचसोबत या चित्रपटातील काही दृश्यांवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गोवारीकर यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

या संपूर्ण वादावर आशुतोष गोवारीकर म्हणतात, " इतिहासातला प्रत्येक संदर्भ तीन तासांच्या सिनेमात दाखवणं शक्य नसतं. इतिहासाच्या पुस्तकाला बरीच पानं असतात. पण सिनेमात ठराविक गोष्टच दाखवावी लागते,त्यामुळे कथेवरुन वादंग उठणं स्वाभाविका आहे." 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive