मराठमोळी पुजा भालेकर बनणार राम गोपाल वर्मांची ‘Girl Dragon’

By  
on  

आजवर आपण मार्शल आर्ट किंवा इतर युद्ध कलांवर बेतलेल्या सिनेमांमध्ये मुख्यत्वे करून अभिनेतेच मारधाड करताना दिसत असतात. पण आता एक अभिनेत्री सर्व व्हिलनना धोबीपछाड देताना दिसणार आहे. राम गोपाल वर्मा एका नव्या सिनेमांसह प्रेक्षकांसमोर आले आहेत. यावेळी सिनेमात मारामारी मात्र हिरो नाही तर एक हिरॉईन करताना दिसणार आहे.  

 

 

‘एन्टर द गर्ल ड्रॅगन’ असं या नव्या सिनेमाचं नाव आहे. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री पूजा भालेकर मुख्य भूमिका साकारत आहे. पुजा या सिनेमात बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल दिसत आहेच. याशिवाय तिचे मार्शल आर्टस स्टंटही अनेकांना तोंडात बोटं घालायला लावतो. अमिताभ बच्चन यांनी या आगामी चित्रपटाचा टिझर आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. जगप्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट ब्रूस लीच्या प्रेरणेवर हा सिनेमा बेतला आहे. इंडो-चायनिज निर्मिती संस्थेने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

Recommended

Loading...
Share