By  
on  

'मकडी'फेम अभिनेत्री श्वेता बसु प्रसाद वर्षभरातच झाली पती पासून विभक्त

'मकडी' फेम अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद आठवतेय ना ! छोट्या पडद्यावरील लोकप्रिय हिंदी मालिका कहानी घर घर की मध्येसुध्दा तिने बालकलाकार म्हणून लक्षवेधी भूमिका साकारली होती. श्वेताने नुकतंच आपला पती रोहित मित्तलसह विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 

वर्षभराच्या आतच श्वेता आणि रोहितने आपला संसार मोडण्याचा निर्णय घेतलाय. 13 डिसेंबर 2018 रोजी श्वेता आणि रोहित विवाहबंधनात अडकले होते. त्यापूर्वी ते दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. फॅंटम सिनेमाच्या सेटवर रोहित आणि श्वेताची गाठभेट झाली होती. दोघांचेही मागच्या वर्षी लग्नाचे व हनिमूनचे फोटो व्हायरल झाले होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shweta Basu Prasad (@shwetabasuprasad11) on

 

श्वेताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक नोट शेअर करत आपण रोहितपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. श्वेता म्हणते, "मी आणि रोहित मित्तल आम्ही दोघांनीसुध्दा परस्पर सामंजस्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक महिन्यांनंतर आम्ही हा निर्णय घेण्यावर ठाम झालो आहोत. मला दिलेल्या अविस्मरणीय क्षणांसाठी रोहित तुझे खुप खुप आभार. भावी आयुष्यासाठी तुला शुभेच्छा, मी नेहमीच तुझी चिअर लीडर राहीन." 

2014 रोजी श्वेता बासू प्रसाद ही एका सेक्स रॅकेटमध्ये अडकल्याने अचानक प्रसिध्दी झोतात आली होती. तिला रेस्क्यू होममध्येसुध्दा तिची रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर हैद्राबाद कोर्टाने तिला क्लिन चीट दिली व त्यानंतर पुन्हा नव्याने तिने आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात केली.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive