By  
on  

'तानाजी द अनसंग वॉरियर'मध्ये ह्या भूमिकेत दिसणार इलाक्षी गुप्ता

डॉक्टर, सुपरमॉडेल, आणि अभिनेत्री इलाक्षी गुप्ता आता 'तानाजी द अनसंग वॉरियर' ह्या चित्रपटातुन बॉलीवूड मध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई मोहिते ह्याची ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेते शरद केळकर साकारत आहे. तानाजी हा तिचा पहिला बॉलीवूड चित्रपट आहे. इलाक्षी अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, आणि शरद केळकर यांच्यासोबत ह्या भव्य चित्रपटातून पदार्पण करणार असल्याने ती या सिनेमाबाबत खुपच उत्सुक आहे. 

तानाजीच्या आगोदर इलाक्षीने प्रदीप सरकार दिग्दर्शित ‘कोल्ड लस्सी आणि चिकन मसाला’ या ऑल्टबालाजी वेब सीरिजमध्ये काम केले आहे. इलाक्षीने २०१५ साली मिसेस इंडिया ग्लोबचा किताब मिळवला होता. तानाजी नंतर लवकरच इलाक्षी मराठी सिनेमात  पदार्पणासाठी सज्ज होणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंह शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित एक झंझावात लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येतोय. महत्त्वाचं म्हणजे हिंदीसोबतच हा सिनेमा आपली मायबोली मराठीतसुध्दा डब होत आहे. 

ओम राऊत दिग्दर्शित  'तानाजी: द अनसंग वॉरियर' हा सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.   

 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive