By  
on  

अपना टाईम चला गया ! 'गली बॉय' ऑस्करच्या स्पर्धेतून बाद

रणवीर सिंह आणि आलिया भट स्टारर 'गली बॉय' हा सुपरहिट सिनेमा अखेर ऑस्कर 2019 च्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारताकडून ऑस्करच्या सर्वोत्तम परदेशी भाषा चित्रपट विभागासाठी ‘गली बॉय’ला निवडण्यात आले होते, मात्र ऑस्करकडून अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सने जाहीर केलेल्या सर्वोत्तम दहा परदेशी भाषांच्या चित्रपट यादीत 'गली बॉय'ला स्थान मिळाले नाही.त्यामुळे साहजिकच  चाहते या बातमीने नाराज झाले आहेत. 

'गली बॉय' हा सिनेमा यंदा फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. झोया अख्तर दिग्दर्शित या सिनेमात मुराद या धारावीत राहणा-या तरुणाची संघर्ष कथा पाहायला मिळते. समिक्षकांसह प्रेक्षकांनीसुध्दा या सिनेमाला पसंतीची पावती दिली. बॉक्स ऑफीसवरसुध्दा या सिनेमाने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली होती. 

 

ऑस्करकडून जाहीर करण्यात ालेली 10 सिनेमांची यादी खालीलप्रमाणे :

चेक रिपब्लिक: 'द पेंटेड बर्ड'
एस्टोनिया: 'Truth and Justice'
फ्रांस: 'लेस मिसरेबल्स'
हंगरी: 'Those Who Remained'
नॉर्थ मैसेडोनिया: हनीलैंड
पोलैंड: 'कॉर्पस क्रिस्टी'
रूस: 'बीनपोल'
सेनेगल: 'अटलांटिक'
साउथ कोरिया: 'पैरासाइट' 
स्पेन: 'Pain and Glory'

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive