By  
on  

यासाठी अक्षय कुमारला आवडतो रणवीरसिंगमधील अवखळपणा

अक्षय कुमारने बहुप्रतिक्षित सुर्यवंशी सिनेमाचं शुटिंग नुकतंच संपवलं आहे. या सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये रोहीत शेट्टीचे आतापर्यंतचे सगळे कॉप एकत्र दिसणार आहेत. अक्षयने अजय देवगण आणि रणवीर सिंग यांच्यासोबतच्या क्लायमॅक्सच शुटींग नुकतंच संपवलं आहे. 
यावेळी एका प्रथितयश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अक्षयने रणवीर आणि अजयसोबतचा काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

 

 

अक्षय म्हणतो रणवीर ‘चॉकलेटच्या दुकानात उभ्या असलेल्या मुलाप्रमाणे आहे. त्याला सेटवर पळापळ करताना पाहणं मजेशीर असतं. अजय आणि मी बरेच सिनेमे एकत्र केले आहेत. त्यापैकीच हा एक सिनेमा आहे. अजयसोबत मी ‘इन्सान’ हा सिनेमा एकत्र केला होता.’ 
या सिनेमात या तिघांसोबत सिकंदर खेर, गुलशन ग्रोव्हर आणि कतरिना कैफपुढील वर्षी 27 मार्च 2020मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. याशिवाय अक्षय ‘गुड न्युज’ सिनेमांमधूनही रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive