सिनेसृष्टीचे महानायक अमिताब बच्चन यांचा रविवारी 'दादासाहेब फाळके' या सर्वोच्च पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बच्चन यांचा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराच्या यापूर्वीच्या समारंभात अमिताभ बच्चन प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे रविवारी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बच्चन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दादासाहेब फाळके पुरस्कार स्विकारताना अमिताभ बच्चन म्हणाले, " प्रेक्षकांचं प्रेम आणि कुटुंबियांचा आर्शिर्वाद आणि देवाची कृपा यामुळेच आज मी इथे उभा आहे. हा पुरस्कार मी अत्यंत कृतज्ञता आणि विनम्रतेने स्विकार करतो. पुढेसुध्दा मला माझं काम असंच सुरु ठेवायचं आहे."
T 3592/3/4/5 - .. my immense gratitude and respect for this moment .. pic.twitter.com/WavW3Hwkjw
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 29, 2019
2020 मध्ये अमिताभ बच्चन यांचे 'गुलाबो सिताबो', 'चेहरे' , 'झुंड' आणि 'ब्रह्मास्त्र हे सिनेमे सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहेत.
T 3592/3/4/5 - .. my immense gratitude and respect for this moment .. pic.twitter.com/WavW3Hwkjw
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 29, 2019