By  
on  

दीपिका पादुकोण आणि विक्रांत मेस्सीच्या 'छपाक'ला मिळालं 'यू' सर्टिफिकेट

मेघना गुलजार दिग्दर्शित आणि दीपिका पादुकोण व विक्रांत मेस्सी स्टारर 'छपाक' सिनेमाची प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे.अॅसिड हल्ला पिडीत लक्ष्मी अगरवालच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाला 'यू' सर्टीफिकेट मिळालं आहे. त्यामुळे फिल्म मेकर्सचा उत्साह द्विगुणित झाला आहे.  'यू' सर्टिफिकेट मिळाल्यानंतर  'छपाक' हा सिनेमा संपूर्ण कुटुंबिय एकत्र पाहू शकतात, याचा आनंद मेघना गुलजार यांनी व्यक्त केला. 

सध्या दीपिका आणि विक्रांत हे दोघंही आपल्या सिनेमाचं जोरदार प्रोमोशन करतायत. तर मेगना गुलजार बिहाईंड द सीन राहून सिनेमाबाबतचे विविध व्हिडीओ पोस्ट करुन 'छपाक'चं प्रोमोशन करतेय 

दीपिका पादुकोणची प्रमुख भूमिका असलेला 'छपाक' सिनेमा येत्या 10 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  अॅसिड हल्ला पिडीत लक्ष्मी अगरवालच्या सत्य घटनेवर आधारित असलेल्या व मेघना गुलजार दिग्दर्शित या सिनेमात लक्ष्मीच्या भूमिकेत दीपिकाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I can’t remember what we were laughing about. But I do remember how well we work together. Always. #chhapaak

A post shared by Meghna Gulzar (@meghnagulzar) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive