By  
on  

Birthday Special: 'अंग्रेजी मिडीयम'मधून मिस्टर चंपकच्या अवतारात इरफानच्या चेह-यावरचं पाहा निखळ हास्य

बॉलिवुडचा चतुरस्त्र अभिनेता इरफान खानचा आज वाढदिवस. कॅन्सरशी यशस्वी झुंज देणा-या इरफानने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडपासून ते अगदी हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण केली.  सर्वांचा लाडका अभिनेता इरफान खान आज त्याचा ५३वा वाढदिवस साजरा करत आहे.  

इरफान खानचा कमबॅक सिनेमा म्हणून सर्वचजण सध्या 'अंग्रेजी मिडीयम'ची वाट पाहतायत.इरफान खान व अभिनेत्री करिना कपूर खान हे आगामी 'अंग्रेजी मिडीयम' सिनेमानिमित्त एकत्र झळकतायत. या दोघांची केमिस्ट्री पाहणं रंजक ठरणार आहे. चाहत्यांमध्ये करिना आणि इरफानला एकत्र पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच आता सिनेमाच्या मेकर्सनी इरफानच्या वाढदिवसानिमित्त सिनेमातील त्याचा एक लुक उलगडून त्याला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे. चाहत्यांनी त्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

या सिनेमातील लुकमध्ये इरफान खानचं निखळ हास्य पाहायला मिळतंय. खुपच निरागस असा हा लुक आहे. यापूर्वी सिनेमातील करिना व इरफानचा एक लुक व्हायरल झाला होता. 'अंग्रेजी मिडीयम' हा इरफान खानच्या 2017 साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट 'हिंदी मिडीयम'चा सिक्वल आहे. या सिनेमात करिनाला एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिका-याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर इरफान आपल्या  मुलीचं संगोपन करताना पाहायला मिळेल.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive