By  
on  

पाहा Photo: नवरीच्या रुपातील करिना कपूररचा लाल सिंह चढ्ढामधून पाहा हा लुक

आमिर खान हिमाचल प्रदेशमध्ये 'लाल सिंह चढ्ढा'ची शूटींग करतोय. त्याचे या सेटवरचे फोटो काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाले होते. सोशल मिडीयावरच नाही तर सिनेरसिकांमध्ये सुध्दा आमिर खान आणि करिना कपूर खानच्या 'लाल सिंह चढ्ढा'ची सर्वत्रच प्रचंड उत्सुकता आहे. आमिरनंतर आता करिनाचा या सिनेमाच्या सेटवरुन एक जबरदस्त लुक व्हायरल होत आहे. नवरीप्रमाणे सजलेल्या करिनाचं रुप खुपच सजलेलं व मनमोहक दिसतंय. 

'लाल सिंह चढ्ढा' हा इंग्रजी सिनेमा फॉरेस्ट गम्पचा ऑफीशियल रिमेक आहे. आपला मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णीने या सिनेमाची कथा लिहली आहे. करिनाला या सिनेमातील लुकमध्ये पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असणार यात शंका नाही. 

'3 इडियट्स' (2009)  नंतर करिना आणि आमिर खान एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive