By  
on  

Confirmed: शशांक खेतानचा 'मिस्टर लेले' बनलाय वरुण धवन

प्रसिध्द निर्माता करण जोहरने आपल्या आगामी प्रोजेक्टेची नुकतीच सोशल मिडीयावर घोषणा केली. दिग्दर्शक शशांक खेतान हा नवा सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीस येतोय. 'मिस्टर लेले' हा नवा कोरा धम्माल विनोदी सिनेमा असून अभिनेता वरुण धवन या सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकतोय.  

करणने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात वरुणने हातात पिस्तूल आणि घाबरलेला पाहायला मिळतोय. फक्त एक शॉर्ट पॅण्ट त्याने परिधान केलेली पाहायला मिळतेय. धर्मा प्रोडक्शनने आपल्या इन्स्टाग्रामवर म्हटलंय, " ड्रीम टीम परततेय. 2021 मध्ये तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे." पण अद्याप या सिनेमाच्या लीड हिरोईन बद्दलची माहिती गुलदस्त्यातच आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive