By  
on  

शरद केळकरची अजय देवगणच्या 'भूज : द प्राईड ऑफ इंडीया'मध्ये वर्णी; राणा डग्गुबतीला केलं रिप्लेस

अभिनेता शरद केळकर 'तानाजी' सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आणि त्याचा  फर्स्ट लुक उलगडल्यापासूनच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरसुध्दा त्याच्या भूमिकेचं विशेष कौतुक होत असून एकंदरीतच सिनेमा बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणं घेत  आणि अशातच शरद केळकरच्या पारड्यात आणखी सिनेमा पडला आहे, तो म्हणजे 'भूज :  द प्राईड ऑफ इंडीया'

अजय देवगणच्या  'भूज :  द प्राईड ऑफ इंडीया' या आगामी सिनेमामध्ये अभिनेता शरद केळकर  आर्मी ऑफीसरच्या भूमिकेत झळकतोय. यापूर्वी ही भूमिका राणा डग्गुबती साकारणार होता. शरदने त्याला या सिनेमात रिप्लेस केलं आहे. 

एका आघाडीच्या इंग्रजी दैनिकाशी बोलताना शरद म्हणाला, " हो, मी  'भूज :  द प्राईड ऑफ इंडीया' सिनेमात मी आर्मी ऑफीसरच्या भूमिकेत आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक दुधैया मला माझ्या स्ट्रग्लिंग काळापासून ओळखतो. त्यानेच मला ही भूमिका ऑफर केलीय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तानाजी सिनेमामुळे माझा सुपरस्टार अजय देवगणसोबत बॉण्ड खुपच चांगला झाला आहे, तसंच सिनेमात संजय दत्त सुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत असून त्यांच्यासोबतसुध्दा माझा चांगला रॅपो आहे. 

 'भूज :  द प्राईड ऑफ इंडीया'मध्ये अनेक अॅक्शन सीन्स आहेत आणि राणा डग्गुबती यांना रिकव्हर होण्यास काही महिने लागतील, त्यामुळे अभिषेकने ही भूमिका मला ऑफर केली,व लहानपणापासूनचं आर्मीचं आकर्षण मला होतं त्यामुळे ही  भूमिका नाकारण्याचा प्रश्नच आला नाही. 

छत्रपची शिवाजी महाराजांच्या भूमिकेनंतर आता शरद केळकरला आर्मी ऑफीसरच्या भूमिकेत पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 'भूज :  द प्राईड ऑफ इंडीया' हा टीसीरीज, अजय देवगण फिल्मस आणि सिलेक्ट मिडीय होल्डींग्ज यांची सहनिर्मिती असलेला सिनेमा यंदा स्वातंत्र्यदिनी 2020 रोजी सिनेरसिकांच्या भेटीला येतोय. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive