'हर हर महादेव'..... 'तानाजी- द अनसंग वॉरियर' सिनेमा आता महाराष्ट्रात होणार टॅक्स फ्री

By  
on  

नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावरुन 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली आणि तमाम रसिकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला. आता सिनेप्रेमींसाठी एक खुशखबर आहे. आता हा सिनेमा महाराष्ट्रातही करमुक्त होणार आहे. 'तान्हाजी' करमुक्त करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाले. मुख्यमंत्री लवकरच त्याबाबत घोषणा करतील, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.यामुळे  शिवाजी महाराजांचा पराक्रमी  इतिहास आता सर्वचजण अनुभवू शकणार आहेत. 

 

मराठमोळा बाज असलेला हा सिनेमा ट्रेलरपासूनच रसिकांच्या पसंतीस उतरला होता. हा सिनेमा मराठीमध्येही डब झाल्याने मराठी सिनेप्रेमींमध्ये आनंदाला उधाण आलं. ओम राऊत दिग्दर्शित  'तानाजी: द अनसंग वॉरियर'  मध्ये अजय देवगण, सैफ अली खानसह अभिनेत्री काजोल सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत झळकली. हा सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. यापूर्वी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने हरियाणामध्ये तानाजी सिनेम टॅक्स फ्री केला होता. 

 

बॉक्स ऑफीसवर तानाजी सिनेमाची सध्या यशस्वी घौडदौड सुरु आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे. 

Recommended

Loading...
Share