By  
on  

रितेश देशमुखचा बॉबीसाठी 'लय भारी' डान्स, पाहा व्हिडीओ;

अभिनेता बॉबी देओलवर वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवुडमधील बरीच कलाकार मंडळी बॉबीला सोशल मिडीयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र या अभिनेत्याने बॉबीला अश्या हटके अंदाजात विश केलं आहे. हा अभिनेता आहे रितेश देशमुख, आणि रितेशने दिग्दर्शक अहमद खानसोबत मिळून बॉबीसाठी एक भेटवस्तू पाठवली आहे. याच भेटवस्तूचा व्हिडीओ रितेशने सोशल मिडीयावर पोस्ट केलाय. या व्हिडीओत रितेश आणि अहमद खान डान्स करताना दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

‪From the sets of #Baaghi3 - Happy Birthday @iambobbydeol - @khan_ahmedasas grooving with yours truly. ‬

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

बॉबी देओलच्या ‘तेरी अदाओ पे मरता हूँ’ या प्रसिद्ध गाण्यावर रितेश आणि अहमद यांनी डान्स केला आणि बॉबी देओलला अशा हटके अंदाजात विश केलं आहे. सध्या अहमद खान दिग्दर्शित ‘बागी-3’ या सिनेमाचं चित्रीकरण रितेश करतोय. आणि याच सिनेमाच्या सेटवरुन दोघांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. 


सोशल मिडीयावर या व्हिडीओला प्रचंड लाईक्सही मिळत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive