By  
on  

अजय देवगण स्टारर स्पोर्ट्स ड्रामा 'मैदान'चा हा फर्स्ट लुक पाहिलात का?

'तानाजी'सिनेमाने बॉक्स ऑफीसवर आपली यशस्वी घौडदौड सुरुच ठेवलीय. इतकंच नाही तर तमाम सिनेरसिकांच्या मनावर हा सिनेमा अधिराज्य गाजवतोय.200 कोटींच्या क्लबमध्ये सामिल झालेल्या तानाजीच्या यशाचा आनंद साजरा करतानाच आता अजयने आपल्या आगामी  'मैदान'  सिनेमाची घोषणा सोशल मिडीयावरुन केली आहे. सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आलेला हा टीजर पोस्टर रसिकांमध्ये सिनेमाबाबतची उत्त्कंठा वाढवणारा ठरतोय. 

'मैदान'  सिनेमाच्या पोस्टरवर फुटबॉलपटूंचे फक्त पायच दिसून येतायत. यावरुन फुटबॉलवर खेळावर हा सिनेमा आधारित असल्याचं समजतंय. भारताचे दिग्गज फुटबॉल कोच सैय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे. फुटबॉलपटू खेळाडूंचा झंझावात या सिनेमात अनुभवता येणार आहे. 

 

भारतीय फुटबॉलपटूंच्या जीवनावर आधारित  'मैदान' सिनेमाचं दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ शर्मा करतायत. बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुणव जॉय सेनगुप्ता यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर यंदा 27 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive