By  
on  

“सीएए हा काळा कायदा” – उर्मिला मातोंडकर, विधान करताना केली ही चूक

सध्या सगळीकडेच सुधारित नागरिकत्त्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) याविषयी चर्चा होत आहेत. फक्त चर्चाच नाहीत तर आंदोलनंही सुरु आहेत. मात्र बॉलिवुड कलाकार या सगळ्या प्रकारावर व्यक्त होत आहेत. यातच आता अभिनेत्री आणि काँग्रेसची माजी सदस्य उर्मिला मातोंडकर यांनीही सरकारवर टीका केली आहे.

 उर्मिला म्हटल्या की, “सीएए हा काळा कायदा म्हणून याची इतिहास नोंद करेल. सीएए कायदा मुस्लिम मिरोधी भासवला जात आहे. तो मुस्लिम विरोधी तर आहे पण गरिबांच्याही विरोधात आहे. त्यामुळे हा कायदा आम्हाला मान्य नाही.” 
 या कायद्याची तुलना उर्मिला यांनी रौलेट कायद्याशी केली आहे. उर्मिला म्हणते की, “हा कायदा ब्रिटीशांच्या रौलेट अॅक्ट सारखा काळा कायदा आहे.”


 पुढे त्या म्हटल्या की, “ज्या व्यक्तीने महात्मा गांधींवर गोळ्या झाडल्या ती व्यक्ती कोण होती? तो एक मुसलमान होता? का शीख किंवा ख्रिश्चन होता? तो एक हिंदू होता. आता याविषयी मी काय वेगळं सांगू. सध्या जे सुरु आहे ते अत्यंत भितीदायक आहे.”
याविषयी बोलत असताना उर्मिला यांनी विधानात एक चूक केली आहे. सीएएविषयी भूमिका मांडत असताना उर्मिलाने महायुद्धाच्या माहितीत चूक केली. 1919मध्ये पहिले महायुद्ध संपले मात्र या ऐवजी 1919मध्ये दुसरे महायुद्ध संपले असं उर्मिला म्हटल्या. आणि यावरून आता नेटकऱ्यांनी उर्मिलाला ट्रोलही केलय.
सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी अहिंसात्मक जनआंदोलन या विषयावर महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित सभेला उर्मिला यांनी हजेरी लावली होती. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive