प्रियांकाच्या ड्रेसवर आई मधू चोप्रा म्हणते...

By  
on  

देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमीच आपल्या विविध फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. आता तर ती ग्लोबल आयकॉन म्हणून छाप पाडते. पण नुकताच प्रियांका चोप्रा जोनासला ट्रोलर्सचा सामना करावा लागला. प्रसिध्द ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात प्रियांकाने घातलेल्या व्हाईट डीप नेक ड्रेसमुळे ती प्रचंड चर्चेत आली आणि तिला त्या ड्रेसवरुन बरीच नावंसुध्दा ठेवण्यात आली.

काही ट्रोलर्सनी तर असं म्हटलंय की, प्रियांकाने हॉलिवूड स्टार जेनिफर लोपेज यांच्या ड्रेसची प्रियांकाने कॉपी केली असून हा ड्रेस जेनिफरने 20 वर्षांपूर्वी घातला होता. आता प्रियांकाच्या सपोर्टमध्ये तिची आई मधू चोप्रा धावून ऐली आहे 

एका कार्यक्रमादरम्यान प्रियांकाच्या चर्चित ड्रेसबद्दल त्यांना विचारणा झाली. तेव्हा मधु चोप्रा म्हणतात, " प्रियांका ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यातील ड्रेसमध्ये खुपच सुंदर दिसत होती. नेहमीप्रमाणेच तिचा आत्मविश्वास होता. ट्रोलर्सचं कामच आहे ट्रोल करणं. तिने घातलेल्या  ड्रेसमुळे तिने कोणाला हानी तर नाही ना पोहचवली. तिचं आयुष्य आहे तिची मर्जी. तिने हा ड्रेस घालण्यापूर्वी एक सॅम्पल मला पाठवलं होतं. मला यात थोडी रिस्क वाटली होती, पण हा एक शानदार ड्रेस ठरला."

 

Recommended

Loading...
Share