कपूर घराण्यातील लग्नसोहळे हे चर्चेचा विषय असतात. असाच एक लग्नसोहळा चर्चेचा विषय ठरलाय. रिमा कपूर यांचा मुलगा अरमान जैन हा त्याची गर्लफ्रेंड अरिसा मल्होत्रासोबत लग्नबंधनात अडकला. यावेळी कपूर परिवारातील बरीच मंडळी उपस्थित होती. बेबो करिना कपूर खान, सैफ अली खान, तैमुर, करिश्मा कपूर आणि मुलगी समिरा कपूर हे देखील उपस्थित होते. यावेळी बेबो करिना आणि लोलो करिश्मा यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं. दोघीही आपल्या भावाच्या लग्नात मनसोक्त नाचताना दिसल्या. अरमानच्या लग्नाच्या वरातीत या सगळ्यांनीच चांगलीच धमाल केली.
पिवळ्या रंगाची साडी, केसात माळलेला गजरा अशा लुकमध्ये बेबो सुंदर दिसली.
तर करिश्मा कपूरही गुलाबी रंगाच्या साडीत सुंदर दिसली.
तैमुरही या लग्नात गोंडस दिसत होता. तैमुरने निळ्या रंगाचा कुरता परिधान केला होता.
यावेळी सैफ अली खानच्या खांद्यावर बसून तैमुरही थिरकताना दिसला.
शिवाय बऱ्याच बॉलिवुड कलाकारांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. अरमान जैनचा हा लग्नसोहळा चांगलाच ग्रँड ठरला.