By  
on  

सारा म्हणते, 'एक चांगलं प्रोजेक्ट मला आणि बाबांना नक्कीच एकत्र आणेल'

सैफ अली खानची लेक म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलेल्या सारा अली खानने आता स्वत:चं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. तिचं जबरदस्त फॅनफॉलोव्हिंग आहे. साराच्या कामाचंसुध्दा नेहमीच कौतुक होताना पाहायला मिळतं. पण एक प्रश्न सारा आणि सैफ या दोघं बापलेकींना विचारला जातो, ते म्हणजे तुम्ही एकत्र कधी झळकणार?

एका मुलाखतीत नुकतंच साराने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. सारा म्हणते, " मला आणि बाबांना एकत्र काम तर करायचंच आहे. एखादा दिग्दर्शक छान कथेसह आमचा विचार करेल, तेव्हाच आम्हाला एकमेकांसोबत काम करण्याची संधी मिळेल अशी मला आशा आहे"

सारा सध्या लव आज कलच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. तिने सागितलं की, ब-याचदा तिने बाबा आणि दीपिकाचा लव आज कल हा सिनेमा पाहिलाय आणि ती दीपिका व दिग्दर्शक इम्तियाज अलीची मोठी चाहती आहे.  

सैफ आणि सारा या बापलेकीच्या जोडीला सिनेमात पाहायला सर्वच उत्सुक आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive