Video:माधुरी म्हणते पतीराजांना, 'तुमच्यावरचं प्रेम मी शब्दात व्यक्त करु शकत नाही'

By  
on  

अवघ्या बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी धक धक गर्ल माधुरी दीक्षित आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांवर अनेक दशकं मोहिनी टाकते आहे. अनेक सुपरहिट सिनेमे माधुरीने बॉलिवूडला दिले. अमेरकास्थित डॉ. श्रीराम नेने यांच्यासह विवाहबध्द झाल्यानंतर तीसुध्दा अमेरिकेतच स्थायिक झाली आणि सुखी संसारात रममाण झाली. पण काही वर्षांपूर्वीच ती पती आणि दोन मुलांसह भारतात परतली व पुन्हा आपल्या करिअरच्या सेकंड इनिंगला सुरुवात केली. 

माधुरी अनेक डान्स रिएलिटी शोचं परिक्षण असो किंवा बॉलिवूडमध्ये पुरागमन किंवा मराठी सिनेमात पदार्पण असो यांत उत्साहात पुढाकार घेताना दिसते. मराठी सिनेमात पदार्पण करण्यासोबतच तिने आता मराठी सिनेमांची निर्मिती करण्यावरही भर दिला आहे आणि या सर्वांत तिला पती डॉ. श्रीराम नेने यांची खंबीर साथ मिळतेय. 

आज डॉ. श्रीराम नेने यांचा वाढदिवस म्हणून माधुरीने पतीराजांना एक खास व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओत ती रंगीबेरंगी फुग्यांसह आणि लाडक्या कुत्र्यासह पतीराजांवर खास प्रेम व्यक्त करताना पाहायला मिळतेय आणि त्यांच्यावरचं प्रेम आपण शब्दांत व्यक्त करु शकत नाही असंही म्हणतेय. पिपींगमून मराठीतर्फे डॉ. श्रीराम नेने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

माधुरी दीक्षित-नेने निर्मित आगामी  'पंचक'  सिनेमाच्या कथेविषयी आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. माधुरीने यापुर्वी '15 ऑगस्ट’ या सिनेमाची निर्मिती डिजिटल माध्यमातून केली होती. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. 

 

 

Recommended

Loading...
Share