By  
on  

अभिनेता शाहबाज खानच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल

कोरिओग्राफर गणेश आचार्य याच्याविरोधात लैंगिक शोषणाचा आरोपाचं प्रकरण शमतं न शमतं तोच आणखी एका अभिनेत्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमधून झळकलेला अभिनेता शाहबाज खान याच्याविरोधात ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

 

 

 मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्यावर कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहबाज यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘कर्मफलदाता शनी’, ‘चंद्रकांता’, ‘युग’ या मालिकांमधील त्यांच्या भूमिका लक्षवेधी होत्या. याशिवाय राजू चाचा, एजंट विनोद, मेजर साहब यांसारख्या सिनेमामध्ये शाहबाज याची भूमिका होती.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive