By  
on  

माधुरी दीक्षतचा नायक साकारणा-या अभिनेता तापस पॉलचं झालं निधन, वाचा सविस्तर

प्रसिध्द बंगाली अभिनेता आणि तृणमूल कॉंग्रेसचे माजी खासदार तापस पॉल यांचं आज मंगळवारी निधन झाल्याचं वृत्त आहे. ते 61 वर्षांचे होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, कार्डिक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सिनेजगत आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. 

तापस यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. 'साहब', 'परबत प्रिया', 'भलोबासा भलोबासा', 'अमर बंधन', 'अनुरागेर चोयान' या सिनेमांचा समावेश आहे. 'साहब' ह्या सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले होते. 

तापस पॉल यांनी बंगालीसोबतच बॉलिवूडमध्येसुध्दा काम केलं आहे. त्यांनी 'अबोध' सिनेमातून पदार्पण केलं. यात माधुरी दीक्षितचा नायक त्यांनी साकारला होता. राजकारणासोबतच पॉल हे नेहमी अनेक वादांमुळे नेहमीच चर्चेत असायचे. 2016 रोजी तृणमूल काँग्रेसचे खासदार तापस पॉल यांना सीबीआयने रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती. तब्बल 13 महिन्यानंतर त्यांना जामिन मिळाला होता. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive