Movie review: समलैंगिक संबंधाबाबत एक हटके दृष्टी देणारा सिनेमा ‘ शुभ मंगल ज्यादा सावधान’

By  
on  

सिनेमा : शुभ मंगल ज्यादा सावधान 
कलाकार:  आयुष्मान खुराना, जीतेन्द्र कुमार, नीना गुप्ता, गजराज राव, मानवी गागरु, पंखुरी अवस्थी
दिग्दर्शक: हितेश केवल्य 
रेटिंग: 3 मून्स

 

 

आजकाल समलैंगिकतेवर आधीपेक्षा जास्त प्रमाणात चर्चा होत असली तरी हा समलैंगिक असणं ही बाब भारतीय कुटुंबात तितकी सहज स्विकारली जात नाही. नेमका हाच मुद्दा घेऊन दिग्दर्शक हितेश कैवल्य हे शुभमंगल ज्यादा सावधान हा सिनेमा घेऊन आले आहेत. 
‘शुभमंगल सावधान’ पेक्षा अत्यंत वेगळं असलेलं हे कथानक वेगळी अनुभूती करून देतं यात शंका नाही. आयुष्मान खुराना, जीतेन्द्र कुमार, गजराज राव आणि नीना गुप्ता हे या सिनेमात मुख्य कलाकार आहे. 

सिनेमाची कथा सोपी आहे. दोन मुलं आहेत कार्तिक (आयुष्मान खुराना) आणि अमन (जीतेन्द्र कुमार). त्यांचं एकमेकांवर प्रेमही आहे. पण हे प्रेम समाजापुढे व्यक्त करणं तसंच इतरांना पटवून देणंही तितकंच अवघड आहे. या दरम्यान ते दोघंही कार्तिकचे काका (मनुऋषी चढ्ढा) यांची मुलगी (मानवी गगरु) च्या लग्नाला अलाहाबादला जातात. त्याच दरम्यान त्यांच्या समलैंगिक संबंधांचं सत्य समोर येतं. 

 

या दरम्यान अमनचे वडिल शंकर त्रिपाठी (गजराज राव) आणि सुनैना त्रिपाठी (नीना गुप्ता) यांना या संबंधांबाबत समजतं. त्यांना धक्का बसतो. पण अमन आणि कार्तिक त्यांचा दृष्टीकोन बदलवण्यास यशस्वी ठरतात ते सिनेमा पाहिल्यावर कळेलच.
या सिनेमाचा युएसपी आहे तो अभिनय. आयुष्मान खुराना, जीतेन्द्र कुमार, गजराज राव आणि नीना गुप्ता यांनी आपल्या व्यक्तिरेखेत जान ओतली आहे. जितेंद्र आणि आयुष्मानचा अभिनय मन जिंकून जातो. 
सिनेमा पुर्वार्धात फास्ट असला तरी उत्तरार्धात रेंगाळतो. पण ओव्हरऑल आनंद आणि एक वेगळी दृष्टी देतो हे खरं....

Recommended

Loading...
Share