Exclusive: अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बाँब’ची रिलीज डेट नाही बदलली, 22 मे ला येणार रसिकांच्या भेटीला

By  
on  

 पीपिंगमूनला मिळालेल्या खास माहितीनुसार अक्षय कुमारचा कॉमेडी हॉरर सिनेमा ‘लक्ष्मी बाँब’च्या रिलीज डेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. हा सिनेमा ईदच्या मुहुर्तावर झळकणार आहे. ईद 2020ला सलमानचा ‘राधे: युअर मोस्ट वाँटेड भाई’ ही रिलीज होणार आहे.
याच दरम्यान एका बॉलिवूड साईटने अशी अफवा पसरवली आहे की, लक्ष्मी बाँबच्या मेकर्सनी राधेसोबतचा क्लॅश टाळण्यासाठी लक्ष्मी बाँब सिनेमाची रिलीज डेट पुढे नेली आहे.

अक्षयचा हा सिनेमा सुपरनॅचरल सिनेमा आहे तर सलमानचा सिनेमा अ‍ॅक्शन ड्रामा आहे. याशिवाय असंही म्हटलं होतं की, अक्षयच्या परवानगी शिवाय ही डेट बदलली जात आहे. पण पीपिंगमूनने या बातमीमागचं सत्य शोधून काढलं आहे. लक्ष्मी बाँबच्या निर्मात्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ‘हा सिनेमा 22 मेलाच रिलीज होणार आहे.’ यावर अक्षय म्हणतो, ‘ मला आशा आहे की माझ्या सिनेमाच्या रिलीज डेटवर इतर कोणाचीही रिलीज होऊ शकते’. यावर सलमान म्हणतो, ‘ मला आशा आहे की अक्षयचा सिनेमा सुपरहिट होईल आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल. तो माझा मित्र आहे मी त्याला कायमच शुभेच्छा देईन.’

Recommended

Loading...
Share