By  
on  

नाराज सोनम कपूर म्हणते, 'बाबांना न विचारताच केली 'मि. इंडीया'च्या रिबूटची घोषणा'

 जेव्हापासून अली अब्बास जफरने सोशल  मिडीयावरुन 'मिस्टर इंडिया'बनविण्याची घोषणा केलीय, तेव्हापासून त्याला अनेक तर्कवितर्क आणि नानविविध प्रतिक्रियांना सामोरं जावं लागतंय. मि. इंडीयाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यानंतर आता अनिल कपूर यांची लेक आणि अभिनेत्री सोनम कपूरने अली अब्बास जफरवर निशाणा साधला आहे.

 सोनम कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'मिस्टर इंडिया' बनविण्याच्या घोषणेबाबत पोस्ट करत जाहीर नाराजीचा सूर आळवला आहे. ती म्हणते, "रिमेक बनविण्याची अधिकृत घोषणा करण्यापूर्वी मेकर्सनी ना,  शेखर कपूर यांना विचारला ना माझे बाबा अनिल कपूर यांचा सल्ला घेतला. ते या सिनेमाचा महत्त्वपूर्ण भाग होते." सोनमने असं म्हणत एक प्रकारे आपल्या वडिलांच्या आयकॉनिक कामगिरीची बाजू मांडलीय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#FYI

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

तर शेखऱ कपूर यांनी यापूर्वी ट्विट केलं होतं, " मिस्टर इंडिया'बनविण्याबाबत ना मला विचारण्यात आलं, ना कुठे माझा उल्लेख करण्यात आला."

 

अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या बहारदार अभिनयाने सजलेला आणि 90च्या दशकांत धुमाकूळ घातलेल्या मि. इंडीया सिनेमा आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. जबरदस्त गाणी, धम्माल डॉयलॉग्स आणि जबरदस्त अॅक्शन सीन्सने या सिनेमाने रसिकांवर मोहिनी घातली. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive