By  
on  

'शुभमंगल ज्यादा सावधान'बद्दल डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, 'भारीच ना' !

अभिनेता आयुष्मान खुराना बॉलिवूडमध्ये चाकोरीबाहेरचा सिनेमा रसिकांसमोर सादर करण्यासाठी प्रसिध्द आहे. नुकताच त्याचा समलैंगिक संबंधावर आधारित शुभमंगल ज्यादा सावधान सिनेमा प्रदर्शित झाला आहे. पुरुष समलैंगिक लव्हस्टोरीवर आधारित असलेल्या या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने तब्बल 9 कोटींचा गल्ला जमवला. पण या सिनेमाचं कौतुक आता फक्त आपल्या भारतीयांपुरतचं नाही तर सातासमुद्रापारसुध्दा सुरु आहे व ते म्हणजे थेट अमेरिकेचेराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या सिनेमाचं कौतुक केलंय. 
 
अमेरिकी मानवाधिकार संरक्षक कार्यकर्ता पीटर टचल यांनी " ‘शुभ मंगल ज्यादा सावधानच्या संकल्पनेची स्तुती करत अशा विषयांना आता भारतात मान्यता मिळालीय. मागास लोकांचे वैचारिक प्रबोधन करण्याचे काम अशा प्रकारचे सिनेमे करतात आणि हा बॉलिवूड सिनेमा तेच काम करतोय." हे कौतुकास्पद ट्वीट खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी रिट्विट करत 'भारीच ना' ! अशी कॉमेंट केलीय. 

 

डोनाल्ड यांच्या या ट्विटनंतर अनेक कॉमेंट्समधून या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे आणि नेटक-यांमध्ये हे ट्विट वेगाने व्हायरल होत आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive