By  
on  

पाहा Video : आ रही है पुलिस! बच्चेकंपनीने उलगडली 'सूर्यवंशी'च्या प्रदर्शनाची तारीख

रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. अक्षय कुमार आणि कतरिना कैफला ब-याच काळानंतर पुन्हा एकत्र पाहण्यासाठी सर्वच आतुर आहेत. पिपींगमूनने तुम्हाला सर्वप्रथम सांगितलं होतं, की सूर्यवंशी प्रिपोन होतोय आणि गुढी पाडव्याला प्रदर्शित होईल. नुकंताच एक व्हिडीओ मेकर्सनी प्रदर्शित केला आहे आणि  त्यानुसार आता हा सिनेमा 24 मार्चला रसिकांच्या भेटीला येतोय. त्याचं आणखी एक कारण म्हणजे 24 मार्चला मुंबईतील सर्व थिएटर्स 24x7सुरु राहणार आहेत आणि  25 मार्चला गुढी पाडवा आहे. म्हणूनच हा सिनेमा  येत्या 24 मार्चच्या संध्याकाळी रसिकांच्या भेटीला येईल. 

मेकर्सनी एक व्हिडीओ शेअर करत ‘सूर्यवंशी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. प्रदर्शित झालेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता रणवीर सिंग, अजय देवगण, अक्षय कुमार आणि कतरिना कैफ झळकत  आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला रणवीर सिंगजवळ काही लहान मुलं येतात आणि त्याला एक कागद दाखवतात या कागदावर २४ मार्च ही तारीख लिहीलेली असते. हाच कागद ते अजय आणि अक्षयलाही दाखवतात आणि व्हिडीओच्या अखेरीस सिनेमागृह दाखवत हा सिनेमा २४ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं जाहीर करतात.

येत्या 2 मार्चला ‘सूर्यवंशीचा ट्रेलर उलगडण्यात येणार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive