हर हर महादेव! तान्हाजीची यशस्वी घौडदौड अजुनही सुरुच

By  
on  

ओम राऊत दिग्दर्शित आणि अजय देवगण स्टारर 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' सिनेमाची जादू अजूनही रसिकांवर सिनेमागृहांत सुरु आहे. हा सिनेमा प्रदर्शनाच्या इतक्या आठवड्यानंतरही  देशभरात 275 कोटींचा टप्पा पार केला आहे.छत्रपती सिवाजी महाराजांचे शूर शिलेदार तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावरुन 'तानाजी- द अनसंग वॉरियर' सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली. तमाम सिनेरसिकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला. 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर आपली यशस्वी घौडदोड सुरुच ठेवली आहे. 

मराठमोळा बाज असलेला हा सिनेमा ट्रेलरपासूनच रसिकांच्या पसंतीस उतरला होता. ओम राऊत दिग्दर्शित  'तानाजी: द अनसंग वॉरियर'  मध्ये अजय देवगण, शरद केळकर, सैफ अली खानसह अभिनेत्री काजोल सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत झळकली. एका रिपोर्टनुसार अजुनही काही सिनेमागृहांमध्ये हा सिनेमा पाहण्यासाठी रांगा लागत आहेत. 

Recommended

Loading...
Share