By  
on  

आणि सुश्मिता सेनची मुलगी बोलू लागली मराठी, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री आणि मॉडेल सुश्मिता सेन ही तिने दत्तक घेतलेल्या मुली रेने आणि अलीशा यांच्यासोबत राहते. सुश्मिताच्या सोशल मिडीया अकाउंटवर मुलींसोबतचे तिचे वर्कआउट, डान्स व्हिडीओ आणि बऱ्याच गोष्टी ती पोस्ट करत असते. नुकताच सुश्मिताने पोस्ट केलेला धाकटी मुलगी अलिशाचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. 

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने बऱ्याच शाळांमध्ये मराठी भाषा दिनाचे महत्त्व सांगणारे कार्यक्रम होत असतात. यातच अलिशाही शाळेतील तिच्या कार्यक्रमाची तयारी करत होती. यासाठी अलिशाने मराठी भाषेतून भाषण तयार केलं होतं, आणि याचवेळी तिच्या सरावादरम्यानचा व्हिडीओ सुश्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये अलिशा ही तिची शाळा, शाळेतील विद्य़ार्थी आणि शिक्षकांना मराठी भाषेतून मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. अलिशाला मराठी भाषेत बोलताना पाहून सुश्मिताला प्रचंड आनंद झाला असून तिने अलिशाचा सराव करतानाचा व्हिडीओ शूट केला आणि तो तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केला आहे. 

सोशल मिडीयावर सुश्मिताचे तिच्या मुलींसोबतचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत असतात. शिवाय बॉयफ्रेंड रोहमनसोबतचे व्हिडीओ आणि फोटोही ती सोशल मिडीयावर बिनधास्त पोस्ट करताना दिसते. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive