By  
on  

ठरलं तर ! रिचा चढ्ढा आणि अली फजल यांची सुरु झालीय लगीनघाई

गेल्या काही महिन्यांपासून रिचा चढ्ढा आणि अली फजल या बॉलिवूड कपलच्या चर्चा रंगल्या आहेत. ते कुठे लग्न करणार , कोणत्या पध्दतीने करणार , कोणाकोमआला निमंत्रित करणार असे नाना प्रश्न सध्या सर्वांना पडले आहेत. पण खरं तर रिचा आणि अली ही जोडी लग्न खुपच खासगी पध्दतीने करणार आहे. 

रिचा आणि अलीने वांद्रे येथील फॅमिली कोर्टात लग्नाच्या रजिस्ट्रेशनसाठी अॅप्लिकेशन दिल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. 15 फेब्रुवारीला त्यांनी अप्लाय केलं असून रेजिस्ट्रेशनच्या नियमांनुसार आता ते 15 मार्चनंतर ते कधीही लग्न करु शकतात. सध्या रिचा आणि अली शूटींगमध्ये बिझी आहेत, पण लग्नासाठी त्यांना 31 मार्चपर्यंत आपल्या सर्व कमिटमेंट्स पूर्ण कराव्या लागतात. कोर्टमॅरेजनंतर त्यांच्या लग्नसोहळा एप्रिलपर्यंत पार पडेल. 

सर्वांचच आता बी टाऊनमधील या जोडीच्या लग्नसोहळ्याकडे लक्ष लागलं आहे.  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive