By  
on  

Video:पाहा रोहित शेट्टी आणि अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'चा दमदार ट्रेलर

एक्शनपटांचा राजा रोहित शेट्टी आणि बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार यांच्या 'सूर्यवंशी'ची सर्वांना उत्सुकता लागली असतानाच या सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिंघम आणि सिंबाच्या जबरदस्त याशानंतर सर्वांचच रोहितच्या या सिनेमाकडे लक्ष लागून राहिलं आहे. 'सू्र्यवंशी' सिनेमाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनअंतर्गत होत असून ब-याच कालावधीनंतर अक्षय व कतरिना कैफची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 

एखाद्या हॉलिवूड फिल्मला साजेसा असाच ट्रेलर रोहित शेट्टीच्या सूर्यवंशीचा आहे. तब्बल 4 मिनीटांच्या या ट्रेलरमध्ये दहशतवाद्यांना सळो के पळो करुन सोडणा-या मुंबई पोलिसांचा स्वॅग या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. तर नेहमीप्रमाणेच रोहित शेट्टी स्टाईलने गाड्यांची मुक्त उधळण सुरु असल्याचंही पाहायला मिळतंय. कतरिनाच्या अभिनयाची ेक झलकसुध्दा या ट्रेलरमधून दिसली. ती  अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारतेय. तर 'सूर्यवंशी'मध्ये सिंघम व सिंबा यांचासुध्दा मेळ पाहायला  रणवीर सिंह व अजय देवगणने सुध्दा यात जबरदस्त तडका लावलाय तर ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ हेसुध्दा या सिनेमात लक्षवेधी भूमिकेत आहेत,

 24 मार्चला मुंबईतील सर्व थिएटर्स 24x7सुरु राहणार आहेत आणि  25 मार्चला गुढी पाडवा आहे. म्हणूनच 'सू्र्यवंशी' हा सिनेमा  येत्या 24 मार्चच्या संध्याकाळी रसिकांच्या भेटीला येईल. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive