पाहा Video : दिशा टायगरला म्हणते, वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा 'बाघ'

By  
on  

बॉलिवूडचा लाडका टायगर श्रॉफचा आज  30 वा वाढिवस आहे. सिनेवर्तुळातून आणि चाहत्यांकडून टायगरवर शुभेच्छांंचा वर्षाव होत आहे. आणि त्याचा हा वाढदिवस आणखी खास होण्याचं कारण म्हणजे, नेमक्या याच आठवड्यात त्याचा 'बागी 3' हा सिनेमा सिनेरसिकांच्या भेटीला येतोय. अनेकांकडून शुभेच्छा मिळत असताना शुभेच्छा मिळत असतानाच त्याला एका खास व्यक्तीकडूनही खास अंदाजात  शुभेच्छा मिळाल्या आहेत.  

 

ही व्यक्ती म्हणजे त्याची तथाकथित प्रेयसी अभिनेत्री दिशा पटनी. दिशाने टायगरच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आणि टायगर 'तेरी मेरी...' या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. यामध्ये दिशा आणि टायगर हे दोघंही एकमेकांच्या साथीने नृत्य सादर करताना दिसत आहेत. दिशा म्हणते, टायगर तुझ्यासोबत नृत्य मॅच करणं माझ्यासाठी थोडं अवघड होतं पण तु मला सांभाळून घेतलंस . वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा 'बाघ' या शब्दांत दिशाने टायगरला  शुभेच्छा दिल्या आहेत. 

दिशा आणि टायगर या हॉट कपलची बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चा असते. नेहमीच ते एकमेकांसोबत एकत्र फिरताना स्पॉट होतात, इतकंच नाही तर दोघांची केमिस्ट्रीसुध्दा चाहत्यांना खुप भावते. 

 

 

या जुन्या व्हिडीओपासूनच त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळतेय आणि ती आत्ता उत्तरोत्तर रंगत जातेय. आज टायगरचा वाढदिवस हे हॉट कपल कसं साजरं करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

 

Recommended

Loading...
Share