By  
on  

जान्हवी कपूरला वाढदिवशी आली आई श्रीदेवीची आठवण

बॉलिवूडची 'धडक' गर्ल जान्हवी कपूरचा आज 23 वा वाढदिवस. करण जोहरच्या धडक सिनेमाव्दारे श्रीदेवींच्या या लेकीने बॉलिवूड पदार्पण केलं.  संपूर्ण सिनेसृष्टीतून आणि चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या वाढदिवसाच्या आठवणी शेअर करताना जान्हवी अलिकडेच खुप भावूक झाली होती. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने आपल्या वाढदिवसाच्या आठवणींना उजाळा दिला.

श्रीदेवींच्या निधनानंतर जान्हवी आपल्या वाढदिवशी त्यांच्या आठवणींमध्ये रममाण होते. आई श्रीदेवी आणि पप्पा बोनी कपूर माझी संपूर्ण रुम फुग्यांनी सजवायचे. मला खुप स्पेशल फिल करण्याकडे त्या दिवशी त्यांचा प्रयत्न असायचा. मी सर्वांसोबत मिळून केक कापायचे. दोघंही माझे खुप लाड करायचे. पप्पा अजूनही करतात. 

 मला मटेरिलियस्टिक गिफ्ट्स आवडत नाहीत. जवळच्या व्यक्तींसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायला आवडतो. एकदा मी वाढदिवसाला माझ्या मित्र-मैत्रिणींसह अलिबागला गेले होते. तिथे खुप मज्जा केली आम्ही, केक कापला. सर्वांनी मला विविध अंदाजात शुभेच्छा दिल्या. कोणी कविता वाचून दिल्या. कदाचित तेव्हा पहिल्यांदाच मी घराबाहेर वाढदिवस साजरा केला होता. 

जान्हवीचे लवकरच  'तख़्त', 'गुंजन सक्सेना' आणि 'रूही- अफ्जाना' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive