By  
on  

समीरा रेड्डीने चक्क सासूला आपल्या तालावर नाचवलं, पाहा Video

सध्या सोशल मिडीयावर काय पाहायला मिळेल याचा काही नेम नाही.  एखादा व्हिडीओ कधी आणि कसा व्हायरल होईल सांगता येत नाही. नुकतंच बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने आपल्या सासूला चक्क स्वत:च्या तालावर नाचवलं आहे आणि ते ही शब्दश:, आम्ही सांगतोय अभिनेत्री समीरा रेड्डीबद्दल. काही महिन्यांपूर्वीच तिला दुस-यांदा मातृसुख लाभलं. तिने एका गोड कन्येला जन्म दिला. लग्नानंतर ती सिनेसृष्टीपासून दूर झाली व आपल्या कुटुंबाला प्राधान्य देताना पाहायला मिळाली. ती पुन्हा चर्चेत आली. आता समीराने एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती नृत्य करताना दिसत आहे.हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

समीराने सासूसोबत नाचतानाचा एक अफलातून व्हिडिओ तयार करून इन्स्टाग्रामवर शेअर केला. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला असून त्यावर त्यांनी कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. समीराने हा व्हिडिओ फ्लिप द स्विच या कॅप्शननेच शेअर केलं. आतापर्यंत ५ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी कमेन्टही केल्या आहेत. या कमेन्टमध्ये समीरापेक्षा तिच्या सासूचं मंजिरी वर्देचं जास्त  कौतुक होत आहे.

हा व्हिडीओ शेअर करत समीराने ‘फ्लिप द स्वीच’ असे कॅप्शन दिले आहे. त्याचबरोबर अनेक हॅशटॅग देखील वापरले आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive