By  
on  

हॉस्पिटलमधून पसार झाले करोना रुग्ण, भडकले बिपाशा आणि रितेश

जिथे पहावं तिथे फक्त आणि फक्त करोनाचीच दहशत आहे. संपूर्ण जगाला या करोना विषाणूने वेठीm धरलंय. सामान्य काय आणि बडी हस्ती काय, तो कोणालाच सोडत नाही. फक्त खबरदारी घेणं हेच सध्या आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. पण करोनवर उपचार घेत असलेल्या काही रुग्णांनी आणि संशयीत रूग्णांनी पळ काढल्याच्या बातम्या अनेक वृत्तवाहिन्यांनी व्हिडीओ पुराव्यानिशी दाखवल्या त्यामुळे देशभर त्यांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त होत आहे. 

पण सिनेसृष्टीतूनसुध्दा करोनाग्रस्तांच्या या कृत्यावर संताप व्यक्त होत आहे. संवेदनशील अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री बिपाशा बासू यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.   त्याने आणि बिपाशाने ट्विटरवर त्यांचं मत मांडत या रुग्णांचा हा बेजबाबदारपणा असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच त्यांच्या या कृत्यामुळे हा रोग आटोक्यात येण्याएवजी आणखी फोफावेल असं त्यांचं म्हणणं आहे. 

रितेश म्हणतो, “हे अत्यंत बेजबाबदारपणाचं लक्षणं आहे. सरकार आणि वैद्यकीय अधिकारी तुमची मदत करतायेत, त्यांना ती करु द्या. या आजारामुळे जर तुम्हाला एकटं रहावं लागत आहे, तर ते तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या मित्रपरिवारासाठी, घराताल्यांसाठी करतायं. त्यामुळे येथे तुमच्यावर योग्य उपचार होतील. या विषाणूविरुद्ध एकत्र येऊन लढूया. भारताने एकत्र येण्याची गरज आहे”

तर बिपाशा म्हणते, “हे लोक इतके बेजबाबदार कसे असू शकतात? देशाचा एक नागरिक म्हणून आपल्याला सतर्क होण्याची गरज आहे, सरकार आपल्या सहकार्याची गरज आहे.”
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive