By  
on  

परेश रावलसाठी जॉनी लिवर यांचा खास व्हिडीओ, केला ‘आवारा पागल दिवाना’चा सीन 

प्रसिद्ध कॉमेडी किंग जॉनी लिवर यांच्या मुलीनेही त्यांच्या पावलावर पाऊल टाकलय. ज़ॉनी लिवर यांची मुलगी जेमीही तिच्या कॉमेडीने सगळ्यांनाच हसवत असते. जेमी ही सोशल मिडीयावर प्रचंड एक्टिव्ह आहे. शिवाय टिक टॉक एपवरही तिचे कॉमेडी व्हिडीओ चर्चेत असतात. 


मात्र नुकताच तिने असा काही व्हिडीओ केला ज्याची चर्चा सगळीकडे होत आहे. हा व्हिडीओ तिने चक्क तिचे वडिल जॉनी लिवर यांच्यासोबत केला आहे. एवढच नाही तर जॉनी लिवर यांनी काम केलेल्या ‘आवारा पागल दिवाना’ या सिनेमातील सीनवर हा व्हिडीओ केला आहे. 

जॉनी लिवर आणि परेश रावल यांचा प्रसिद्ध सीन या व्हिडीओ करण्यात आला आहे. मात्र यावेळी जॉनी यांनी परेश रावल यांचा डायलॉग म्हटला तर जेमीने जॉनी यांचा डायलॉग म्हटलाय. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून लाईक्सचा वर्षावही होत आहे. या व्हिडीओच्या निमित्ताने जॉनी आणि मुलगी जेमीचा एकत्र व्हिडीओ पहिल्यांदाच पाहायला मिळतोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive