By  
on  

Coronavirus : आरोग्यापेक्षा तारक मेहताच्या निर्मात्यांना लागलीय टीआरपीची काळजी

सध्या जगभर करोना विषाणूने हैदोस घातलाय. त्याच्या कचाट्यातून लहान-मोठे, गरीब-श्रीमंत कोणीच बचावले नाहीत. आता फक्त खबरदारी घेणं इतकंच आपल्या सर्वांच्या हातात आहे. दैनंदिन व्यवहार कोलमडले आहेत. मनोरंजन विश्वालासुध्दा याचा फटका बसला आहे.चित्रपट संघटनांच्या बैठकीत मालिका , सिनेमे, वेब शो आदी सर्वांचंच चित्रिकरण बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला गेला आहे. 

सर्वत्र आरोग्याची चिंता लागून राहिली असतानाचा लोकप्रिय मालिका तारक मेहता का उलटा चष्माच्या निर्मात्यांना मात्र वेगळीच चिंता सतावतेय. या मालिकेच्या निर्मात्यांनी ट्वीट करून शूटिंग चालू ठेवण्याची परवानगी मागितली आहे.तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या निर्मात्यांना सर्वसामांन्यांच्या जीवापेक्षाही टीआरपी महत्त्वाचा आहे, असाच सवाल आता उपस्थित झाला आहे. 

तारक मेहताचे निर्माते असित मोदी यांनी चित्रिकरणाची परवानगी मागण्यासोबतच स्वच्छतेची आणि इतर सर्व गोष्टींची काळजी सेटवर घेतली जाईल असं आश्वासनही दिलं आहे. तर आणखी एक ट्विट करत ते म्हणतात, 'आम्हाला या निर्णयाबद्दल स्पष्ट काही कळत नाहीये. अचानक आम्हाला फिल्मसिटीमध्ये चित्रीकरण करू दिलं जात नाहीये. आम्ही सेटवर स्वच्छता ठेवण्यासोबत आणि कमी लोकांच्या युनिटसोबत सर्व नियमांचं पालन करत आहोत. उद्यापर्यंतची परवानगी द्या.'

असीत मोदी यांच्या या ट्विटनंतर चाहते मात्र भलतेच संतापले आहेत. अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तेव्हा आता सरकारकडून  यावर काय निर्णय देण्यात येतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive