By  
on  

Coronavirus : करोनाच्या विळख्यातून बचाव करण्यासाठी बिग बींनी सांगितले हे खास उपाय

जगभर करोना विषाणूने आपली दहशत पसरवलीय. वणव्यासारखा हा रोग आता भारतातही पसरु लागला आहे.  त्याला टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेणं हेच सध्या आपल्या हातात आहे. म्हणूनच सोप्या पध्दतीने करोना टाळण्यासाठी बॉलिवूडचे महानायक अमिताब बच्चन पुढे सरसावले आहेत. 

अमिताभ यांचा हा व्हिडीओ भारतीय रेल्वे प्रशासनाने जनजागृतीसाठी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात sनी खुप छोट्या छोट्या सवयी अंगीकारण्याची शिकवण दिली असून, त्यामुळे करोना रोगाचा प्रादुर्भाव होण्यापासून आपण आपला बचाव करु शकतो. 

 

करोनामुळे नाही म्हटलं तरी संपूर्ण देशात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पण आपल्या लाडक्या कलाकाराकडून मिळालेल्या या उपयुक्त टिप्स नक्कीच नागरिकांसाठी दिलासादायक ठरतात व मनोबल वाढवण्याचंच काम करतायत, यात शंका नाही. 

 

काय आहेत बिग बींनी दिलेल्या टीप्स ..

खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल घ्या.
एकदा वापरलेला टिश्यू पेपर पुन्हा वापरु नका. त्याचा बंद झाकणाच्या कचरापेटीत फेका
डोळे, नाक आणि तोंडाला सतत हात लावू नका.
आपल्या हातांना वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवा
गरज नसताना घराबाहेर पडू नका
जर खोकला, सर्दी किंवा ताप असल्याचे जाणवत असेल तर लगेचच डॉक्टरांकडे उपचारासाठी जा, वेळ दवडू नका. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive