‘बरसात’च्या लोकप्रिय सिनेअभिनेत्री निम्मी काळाच्या पडद्याआड

By  
on  

 बॉलिवूड सिनेअभिनेत्री निम्मी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या घरी अखेरचा श्वास घेतला. बरसात, दीदार, दाग, उडन खटोला, मेरे मेहबूब, पूजा के फुल, आकाशदीप, लव्ह अँड गॉड या गाजलेल्या सिनेमांमध्ये त्या झळकल्या होत्या. निम्मी या काही काळापासून आजारी होत्या.

निम्मी गेल्या बऱ्याच काळापासून आजारी होत्या. त्यांना घराजवळच्या रुग्णालयात दाखलही करण्यात आलं होतं. तसंच त्यांना स्मृतीभ्रंशही झाला होता. निम्मी यांनी राज कपूर, देव आनंद आणि दिलीप कुमार या सारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं होतं. निम्मी यांनी लेखक अली राजा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीही ट्विट करत निम्मी यांना श्रध्दांजली वाहिली. तुम्ही आरके कुटुंबाचा एक भाग होतात असेही ते म्हणाले. तसंच बॉबी सिनेमाच्या प्रिमियरवेळी त्यांनी दिलेले आशिर्वादाचे आजही ऋषी कपूर आभारी आहेत. 

Recommended

Loading...
Share