By  
on  

पद्मिनी कोल्हापुरे व प्रिन्स चार्ल्सच्या किसचा गाजला होता किस्सा, आत्ता करतेय आरोग्यासाठी प्रार्थना

करोनाने जगभर धुमाकुळ घातला आहे. करोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढतो आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन  घोषित केला  आहे. दरम्यान पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८३४ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जण करोनामुळे दगावले आहेत. गेल्या २४ तासात देभशरात रुग्णसंख्येत ७५ ने भर पडली आहे.

करोना ना गरीब पाहतो ना श्रीमंत तो फक्त विषाणू आहे आणि कुठेही तो संचार करतो. आता राजघराण्यातसुध्दा त्याने शिरकाव केला आहे. त्यापुढे सामान्यांची काय त-हा.  काही दिवसांपूर्वीच ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त सर्वत्र झळकले. त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जात असतानाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने पण त्यांच्यासाठी प्रार्थना केलीय. 

प्रिन्स चार्ल्स बरे होण्यासाठी प्रार्थना करणारी अभिनेत्री म्हणजे, पद्मिनी कोल्हापुरे. १९८० दरम्यान प्रिन्स चार्ल्स यांनी भारत दौरा केला होता. त्यावेळी त्याचं स्वागत अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी केलं होतं. त्यावेळे स्वागत करताना प्रिन्स यांच्या गालावर चुंबन घेतलं होतं. त्यानंतर या किसचा गरमा गरम किस्सा मोठ्या चवीने देशभरात चघळला गेला होता. आता नुकतंच एका मनोरंजन वेबसाईटने पद्मिनी कोल्हापुरे यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळी प्रिन्स चार्ल्स करोना विळख्यातून लवकर बरे व्हावे अशी त्यांनी प्रार्थना केलीय. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive