By  
on  

Corona Virus : कोरोनाशी लढण्यासाठी पुढे सरसावला खिलाडी अक्षय कुमार, केली 25 कोटींची मदत 

खिलाडी अक्षय कुमार कित्येक लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. फक्त एक उत्तम अभिनेताच नाही तर उत्तम माणूस म्हणूनही त्याच्यविषयी बोललं जातं. फिटनेसच्या बाबतीतही तो लोकांना जागरुक करत असतो.  याचं कारण तो त्याच्या सिनेमांमध्ये जसा हिरो साकारतो यासाठीच नाही तर तो खऱ्या आयुष्यातही हिरो हे त्यांने वारंवार सिद्ध केलेलं आहे. 

विविध आपातकालीन परिस्थितीत अक्षय कुमारने नेहमीच मदतीचा हात पुढे केलेला आहे. सध्या देशावरच नाही तर जगावर कोरोना व्हायरसचं संकट ओढावलय. या परिस्थितीत विविध सामाजीक संस्था, कलाकार मदतीसाठी पुढे आले आहेत. त्यातच अक्षय कुमारने पुन्हा एकदा तो रियल लाईफ हिरो असल्याचं सिद्ध केलय. मात्र यावेळी त्याने एक नाही दोन नाही तर चक्क 25 कोटींची मदत केली आहे.  कोरोनाशी लढा देण्यासाठी अक्षयने इतकी मोठी रक्कम दान करणं कौतुकास्पद आहे. ही रक्कम त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम केअर्स फंडाकडे दान केली आहे. एवढच नाही तर या परिस्थितीत अशाप्रकारे सर्वाधिक रक्कम देणारा तो पहिला अभिनेता ठरलाय.


कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बरेच कलाकार मदतीचा हात पुढे करत आहेत शिवाय सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही लोकांना जागरुक करत आहे. तर अक्षयही सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही लोकांना जागरुक करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र सध्या ओढावलेलं मोठं संकट आणि त्याच्याशी दोन हात करण्यासाठी मदतीचा हात पुढे येणं गरजेचं होतं. त्यातच अक्षय कुमारने केलेल्या या दानामुळे विविध स्तरावर अक्षयचं कौतुक होतं आहे. रिल लाईफ हिरो साकारणाऱ्या या रिअल लाईफ हिरोला सलाम.

 

Recommended

PeepingMoon Exclusive