अखेर कनिका कपूर झाली करोनामुक्त, सहावा रिपोर्ट आला निगेटिव्ह

By  
on  

बॉलिवूडमधून करोनाची लागण झालेली पहिलाी रुग्ण ठरली ती बेबी डॉल फेम गायिका कनिका कपूर. त्यानंतर बराच वादंग उठला होता. कनिकाने परदेसातून आल्यावर पार्ट्यांना हजेरी लावल्याने मोठा धोका दिसत होता. पण अखेर सहावा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आता ती करोनामुक्त झाली आहे. गायिका कनिका कपूरला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी तिचा हा रिपोर्ट आला. याआधी पाच वेळा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thank you @amrapalijewels and @ekayabanaras for the gorgeous #Lehenga #Makeup @shaylinayak

A post shared by Kanika Kapoor (@kanik4kapoor) on

लखनौच्या  संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGIMS) याठिकाणी तिच्यावर उपचार सुरू होते. १६ मार्च रोजी कनिकामध्ये करोना व्हायरसची लक्षणे दिसून येऊ लागली होती आणि २० मार्च रोजी तिचा पहिला करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

कनिकाला करोना झाला आणि कनिकाचा कहर म्हणजे तिच्या संपर्कात पार्ट्यांमुळे आलेले तब्बल २००-३०० लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले . त्यामुळे करोना व कनिका हा हॉट टॉपिक सोशल मिडीयावर बराच चर्चेत राहिला. 

 

Recommended

Loading...
Share