By  
on  

आयुष्मान मराठीत म्हणाला,' तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी मी नि:शब्द झालो आहे'

आज संपूर्ण जगाला करोना विषाणूने सळो की पळो करुन सोडलंय. या रोगामुळे जगभरात मरण पावलेल्यांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. आपल्या देशातही करोनाचे रुग्ण आता झपाट्याने वाढू लागले आहेत. मुंबईत तर ही संख्या लक्षणीय वाढतेय. देशभर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन काळ जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येकाला घरीच राहून सुरक्षित राहायचं आहे. सरकारी यंत्रणांसोबतच पोलिससुध्दा अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटतायत. 

तहान-भूक विसरुन पोलिस उन्हातान्हात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यांच्या कामाचे तास अविरत आहेत.  नागरिकांनी या लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित  राहावं म्हणून ते त्यांच्या कुटुंबाला सोडून आपली काळजी घेतायत. त्यांच्या कामाच्या तासांचा कुठलाच हिशोब नाहीय, त्यामुळे या कठीण काळात त्याचं मनोधैर्य वाढवण्याची एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. सई ताम्हणकर, सिध्दार्थ चांदेकर या मराठमोळ्या कलाकारांनंतर अक्षय कुमार, अजय देवगण यांनीही मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. तर आता सर्वांचा लाडका आयुष्मान खुरानाने तर चक्क मराठीतच मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. 

बॉलिवूडच्या या बालाने मुंबई पोलिसांना धन्यवादाचं ट्विट करत म्हटलंय, ' तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी मी नि:शब्द झालो आहे, पण आज मी तुम्हाला हदयापासून धन्यवाद देत आहे. '

 

मुंबई पोलिस नेहमीप्रमाणेच हजरजबाबीपणे  म्हणाले, 'धन्यवाद, 'विकी'! आम्ही मुंबईकरांना 'ज़्यादा सावधान' ठेवण्यासाठी सर्व काही करू'. आणि सर्वांची त्यांनी पुन्हा एकदा मनं जिंकली,

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive