By  
on  

video : ‘अब तेरा रोना शुरू हो जाएगा....करोना’- जॉनी लिव्हर

सध्या देशभरा करोना विषाणूने धुमाकूळ घातलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. पण करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय त्यामुळे हा लॉकडाऊन वाढण्याची चिन्हे आहेत. हा करोनाचा कहर लवकरात लवकर थांबावा म्हणून सर्वच सरकारी यंत्रणा युध्दपातळीवर काम करतायत. 

जिथे पाहावं तिथे फक्त करोना आणि करोनाच आहे. त्यामुळे लोक थोडे धास्तावले आहेत, त्यांच्यात सकारात्मकता यावी जरा चैतन्य निर्माण व्हावं यासाठी सर्वांचे लाडके विनोदवीर जॉनी लिव्हर यांनी एक भन्नाट शक्कल काढून एक गाणंच तयार केलं आहे. करोना कसा घाबरून पळून जाईल, ते या गाण्यात जॉनी लिव्हर सांगताना पाहायला मिळतायत. ‘हम हिंदुस्तानी’ या गाण्याच्या चालीवर त्यांनी करोनाचं गाणं सादर केलं आहे. 

‘करोना अब तेरा रोना शुरू हो जाएगा.. भागेगा तू करोना.. मांगेगा ना पानी.. इंडिया मे जो घुसनेकी तू कर बैठा नादानी’, अशी गाण्याची धम्माल सुरुवात करत जॉनी लिव्हर यांनी सर्वांमध्ये थोडी सकारात्मकता आणि लढण्याचं बळ निर्माण व्हावं म्हणून प्रामाणिक प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive