By  
on  

Video : मुंबई पोलिस तुमच्या शौर्याचा मला अतिशय अभिमान वाटतो : सोनाली बेंद्रे

आज संपूर्ण जगाला करोना विषाणूने विळखा घातला आहे. या रोगामुळे जगभरात मरण पावलेल्यांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. आपल्या देशातही करोनाचे रुग्ण आता झपाट्याने वाढू लागले आहेत. मुंबईत तर ही संख्या लक्षणीय वाढतेय. देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येकाला घरीच राहून सुरक्षित राहायचं आहे. सरकारी यंत्रणांसोबतच पोलिससुध्दा अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटतायत. 

तहान-भूक विसरुन पोलिस उन्हातान्हात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यांच्या कामाचे तास अविरत आहेत. आपण या लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहावं म्हणून ते त्यांच्या कुटुंबाला सोडून आपली काळजी घेतायत. त्याचं मनोधैर्य वाढवण्याची एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणूनच मुंबई पोलिस, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक,पालिका कर्मचारी या सर्वांचे मनापासून आभार मानण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने 'दिले से थॅंक्यू' ही सुंदर मोहीम सुरु केली व सर्वच सेलिब्रिटींनी ह्यात सहभाग घेत मुंबईचे रक्षण करणा-या पोलिसांचे आभार मानले. 

बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने मराठीत मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. 

 

सोनाली म्हणते,"करोना विषाणूशी लढताना आपल्या जीवाची बाजी लावणा-या मुंबई पोलिस तुमच्या शौर्याचा मला अतिशय आनंद वाटतो. "

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive