By  
on  

Video : रितेश-जेनेलियाची लॉकडाऊनवाली लव्हस्टोरी पाहिलीत का ?

बॉलिवूड आणि मराठी अशा दोन्ही ठिकाणी रसिकांची लाडकी असणारी क्युट जोडी म्हणजे जेनेलिया आणि रिेतेश देशमुख. तुझे मेरी कसम सिनेमापासून सुरु झालेली या लव्हस्टोरीला म्हणजेच या  दोघांच्या लग्नाला आता बरीच वर्ष झाली, पण त्यांच्यातला रोमॅँण्टीक अंदाज तसूभरही कमी झालेला नाही. अनेकदा ही जोडी फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येते आणि मनं जिंकते. 

रितेश देशमुखने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवरुन जेनेलियासोबतचा एक रोमॅण्टीक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो आणि जेनेलिया साजन सिनेमातलं,' मेरा दिल भी कितना पागल है..'.यावर रोमान्स करताना पाहायला मिळतायत. तर चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कॉमेंटसचा वर्षाव केला आहे. तर अनेकांनी 'भाऊ आणि वहिनी एक नंबर .. ' अशी प्रतिक्रीया दिली आहे. रितेशने ह्याला कॅप्शनही भन्नाट दिलं आहे. लॉकडाऊनवाली लव्हस्टोरी..जेनेलियाचं आवडतं गाणं..साजन सिनेमातलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Love in Lockdown @geneliad ..... favourite song from Saajan.... @madhuridixitnene @duttsanjay

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

या जोडीचा यापूर्वी अजय देवगणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा एक अतरंगी व्हिडीओ समोर आला होता. ज्यात जेनेलिया रितेशला भांडी घासायला देते व तो गीरब बिचारा भांडी घासतो. या दोघांचे हे असे भन्नाट व्हिडीओ नेटक-यांमध्ये नेहमी चर्चेचा विषय ठरतात.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive