By  
on  

CoronaVirus : महाराष्ट्रातल्या वैद्यकीय कर्मचा-यांसाठी किंग खान बनला देवदूत, वाचा सविस्तर

करोनाचा सध्या देशभरात कहर सुरु आहे. महाराष्ट्रात तर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे व राज्य सरकारसाठी ही दिवसेंदिवस चिंतेची बाब ठरत आहे. खबरदारी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी राज्याचा लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या संकटाशी  लढण्यासाठी सरकारी यंत्रणा युध्दपातळी काम करतेय, पण आर्थिक संकटांचं आव्हानसुध्दा यावेळेस मोठं असून त्याच्याशी कसा लढा द्यायचा हासुध्दा एक मोठा प्रश्नच. पण सेलिब्रिटींपासून ते उद्योगपतींपर्यंत अनेक मान्यवरांनी राज्याला या संकटातून सोडविण्यासाठी आपापाल्या पध्दतीने मदतीचा हात देऊ केला आहे. 

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख नुकताच राज्याच्या डॉक्टर्स, नर्सेस यांच्या सुरक्षेसाठी अगदी देवदूत बनून धावून आला आहे.आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तब्बल २५ हजार पीपीई किट्सचे वाटप शाहरुखने केले आहे. (‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट’) करोनाग्रस्तांवर उपचार करण्याऱ्या डॉक्टर, नर्सेस यांची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी शाहरुखने हे पीपीई किट्स वाटले आहेत. यापूर्वी राज्यात पीपीई किट्सचा तुटवडा असल्याचं समोर आलं होतं. शाहरुखच्या या बहुमूल्य मदतीसाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत त्याचे  मनापासून आभार मानले आहेत.तसंच शाहरुखने यापूर्वी पंतप्रदान सहाय्यता निधीला मदत केली होती. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे ट्विट करत म्हणतात, “शाहरुख खान यांनी २५ हजार पीपीई कीट देऊन जो मदतीचा हात पुढे केला आहे. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. करोना विषाणूविरुद्ध लढा देण्यामध्ये याची आम्हाला मदत होईल आणि वैद्यकीय उपचार टीमच्या आरोग्याची काळजीदेखील घेतली जाईल”

तर शाहरुखनेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रतिक्रिया देत त्यांचे आभार मानले .आपण सर्व या संकटाशी लढण्यात व मानवतेच्या संरक्षणासाठी एकत्र आहोत.तुमची मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. तुमची टीम आणि कुटुंबसुद्धा निरोगी व स्वस्थ राहू दे

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive