By  
on  

निर्माते करीम मोरानींची दुसरी Corona virus टेस्टही पॉझिटिव्ह

चेन्नई एक्सप्रेसचे निर्माते करीम मोरानी यांच्या दोन्ही मुली शाजा आणि जोयाच्या करोना टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. पण करीम मोरानींची करोना टेस्ट मात्र पॉझिटिव्ह आली आहे. अलीकडेच त्यांची दुसरी टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. 
त्यांच्यावरमुंबईमधील नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 8 एप्रिलला करीम मोरानींची पहिली टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. 

लिडिंग वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार करीम मोरानी यांची तब्येत ठिक नाही. त्यांची सद्य स्थिती समोर आलेली नाही. सलग दोन रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याचवेळी डिस्चार्ज दिला जातो. मोरानी कुटुंबातील शाजा पहिल्यांदा पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर संपुर्ण कुटुंब क्वारंटाईन केलं गेलं होतं. त्यानंतर जोया आणि करीम मोरानी यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले होते. पण आता शाजा आणि जोयाच्या करोना टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. मोरानी यांचं वय 60 आहे. याशिवाय ते हृदयरोगाचे रुग्णही आहेत. त्यामुळे कुटुंबाची चिंता वाढली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive