By  
on  

Lockdown Birthday : वरुण धवनने कुटुंबियांसोबत असा साजरा केला वाढदिवस

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय आणि हॅण्डसम हिरो वरुण धवन आज ३३ वर्षांचा झाला. करोना संकटामुळे प्रत्येकाला आज घरातच राहणं अनिर्वा्य आहे, त्यामुळे वरुणनेही साहजिकच आपला हा वाढदिवस कुटुंबियासोबत साजरा केला. घरीच तयार करण्यात आलेला हार्ट शेपचा केक वरुणने यावेळेस कापून वाढदिवसाचा आनंद साजरा केला. 

वरुणची फॅन फॉलोव्हिंग फक्त भारतातच नव्हे, तर देशाबाहेरही आहे. म्हणूनच लॉकडाऊनचा हा बर्थ डे वरुण आपल्या चाहत्यांसोबत इन्साटाग्रामवरुन संध्याकाळी ४ वाजता लाईव्ह चॅटव्दारे  साजरा करणार आहे. 

इन्स्टाग्राम स्टोरीवर वरुणने आज २४ एप्रिल रोजी वाढदिवशी ४ वाजता चाहत्यांसोबत लाईव्ह चॅट करुन त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. चाहत्यांसाठी यापेक्षा मोठी गोष्ट असूच शकत नाही. 

दरम्यान, वरुण आणि त्याची लेडी लव्ह नताशा दलाल यांच्या साखरपुड्याच्या घोषणेकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. वरुण व नताशा हे बालपणापासूनचे मित्र आहेत. त्यामुळे ते लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा आहेत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive