फंडरेज़र कॉन्सर्ट ‘I for India’साठी धकधक गर्लने चक्क गायलं हे गाणं आणि मुलाने वाजवला पियानो

By  
on  

नुकतच बॉलिवुडकरांनी मिळून एक कॉन्सर्ट केलं आहे. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी निधी जमा करण्यासाठी या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. नुकतच हे कॉन्सर्ट पार पडलं. या कॉन्सर्टमध्ये दिग्गज कलाकारांनी घरात बसूनच सहभाग घेतला. धकधक गर्ल सुपरस्टार सौंदर्यवती माधुरी दीक्षितही सहभागी झाली होती. या कॉन्सर्टमध्ये माधुरी चक्क गाणं गाताना दिसली आहे.

 

याआधीही माधुरीचं हे सिंगींग टॅलेंट बऱ्याचदा पाहायला मिळालं आहे. मात्र यंदा या कॉन्सर्टमध्ये माधुरीचा गायकी अंदाज पाहायला मिळाला. 'परफेक्ट' हे प्रसिद्ध इंग्रजी गाणं  यावेळी माधुरीने गायलं. एवढच नाही तर माधुरीचा मुलगा आरीनने माधुरीच्या या गाण्याला पियानो वाजवून साथ दिली आहे. या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये माधुरीने दिलेलं हे सरप्राईज पाहून चाहते चांगलेच आनंदी झाले आहेत. सोशल मिडीयावर माधुरीचा हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

 

 ‘I for India’ नावाच्या या कॉन्सर्टमध्ये शाहरुख खान, निक जोनास, प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार, कतरिना कैफ,  ए आर रेहमान, आमिर खान, किरण राव, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अजय-अतुल, आलिया भट, अनुष्का शर्मा,  आयुषमान खुराना यांच्यासह कित्येक बॉलिवुड स्टार्स आणि म्युझिक इंडस्ट्रीमधील दिग्गज सहभागी झाले होते.

Recommended

Loading...
Share